esakal | चांगली बातमी: मुंबईच्या हवेसाठी लॉकडाऊन सकारात्मक

बोलून बातमी शोधा

Mumbai air condition
चांगली बातमी: मुंबईच्या हवेसाठी लॉकडाऊन सकारात्मक
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा 22 एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यातून अनेक कंपन्याही बंद आहेत. शिवाय, दुकाने फक्त वेळेवर सुरू राहिल्यामुळे नागरिकांची ही रस्त्यावरील गर्दी झाली आहे. वर्क फ्रॉम ऑफिसचा पर्याय दिल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असून हवेतील प्रदूषण कमी झाले आहे.

मुंबईची हवा सध्या समाधानकारक असून यातून मुंबईकरांना आरोग्याच्या धोका कमी आहे. त्यामुळे मुंबईच्या हवेसाठी लॉकडाऊन समाधानकारक असल्याची नोंद करण्यात आली आहे. हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार (सफर) लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे श्वसनासाठी धोका वाढवणाऱ्या वायुच्या प्रदूषणाच्या पातळीत ही घट झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. नायट्रोजन ऑक्साईडचं प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होतं. पण वाहने कमी झाल्याने मुंबईची हवा उत्तम दर्जाची नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबईतल्या चाळींमध्ये कशी आहे कोरोनाची परिस्थिती, जाणून घ्या

गेल्या कित्येक वर्षात मुंबईने मोकळा श्वास घेतला नव्हता. मात्र, दोन वेळा लावलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईने मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, मुंबईपाठोपाठ पुण्यातही चांगली हवा नोंदवण्यात आली आहे. दिल्ली आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांमध्ये 170 च्या वर एक्यूआय नोंदवण्यात आला असून मध्यम दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली आहे.

नवी मुंबई, अंधेरीत हवेचा मध्यम दर्जा

दरम्यान मुंबईच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी समाधानकारक हवेची नोंद झालेली असताना अंधेरी आणि नवी मुंबई या दोन परिसरात हवा मध्यम दर्जाची नोंदवली गेली आहे. सर्वाधिक नवीमुंबईत असून 134 एक्यूआय असून त्यापाठोपाठ अंधेरी 105 एक्यूआयची नोंद करण्यात आली आहे. तसेच वायू प्रदूषणासाठी संवेदनशील असणाऱ्या लोकांसाठी आरोग्याची समस्या असू शकते. शिवाय, संवेदनशील लोकांसाठी छोट्या-मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात अशी ही सुचना सफर या कार्यप्रणालीने केली आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी? पालिका 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार

मुंबई संपूर्ण शहर - समाधानकारक   072 एक्यूआय

भांडूप  - समाधानकारक- 057 एक्यूआय

मालाड- समाधानकारक- 098 एक्यूआय

माझगाव- समाधानकारक- 058 एक्यूआय

वरळी- समाधानकारक- 100 एक्यूआय

बोरीवली- समाधानकारक- 052 एक्यूआय

बीकेसी- समाधानकारक- 051 एक्यूआय

चेंबूर- समाधानकारक- 058 एक्यूआय

अंधेरी- मध्यम- 105 एक्यूआय

नवी मुंबई- मध्यम- 134 एक्यूआय

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

lockdown positive for mumbai air no health risk satisfactory aqi record