लॉकडाऊनच्या निरव शांततेत 'त्याला' मुंबईत माजवायचा होता कहर, पण ATS लागली खबर आणि....

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

अनेक दरोड्याचे गुन्हे नावावर असलेला आणि आंध्रप्रदेशातील दरोड्यात फरारी असलेला सराईत दरोडेखोरला बेड्या ठोकण्यात दहशतवादी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांनी पाठकाच्या सहाय्याने मुसक्या आवळल्या.

अंधेरी : अनेक दरोड्याचे गुन्हे नावावर असलेला आणि आंध्रप्रदेशातील दरोड्यात फरारी असलेला सराईत दरोडेखोरला बेड्या ठोकण्यात दहशतवादी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांनी पाठकाच्या सहाय्याने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे हातगत करण्यात आलेली आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

हे ही वाचा : आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

लॉकडाऊनच्या काळात निरव शांतातेचा फायदा उचलण्यासाठी सराईत दरोडेखोर दलविरसिंग बलवंतसिंग रावत उर्फ राजा उर्फ पप्पु नेपाळी (38) हा दरोड्याचा तयारीत येणार असल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक याना खबऱ्याने दिली. सदर खबऱ्याची माहिती वरीष्ठ अधिकारी यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी रावत याला 23 मे रोजी अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलीस पथकाला 2 देशी बनावटीची पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे सापडली.

हे ही वाचा आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

आरोपी दलविंरसिंग बलवंतसिंग रावत उर राजा उर्फ नेपाळी पप्पू याच्या नावावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई पोलीस ठाण्यात जवळपास 30 सशस्त्र दरोड्याचा गुन्हे दाखल आहेत. तर याच आरोपीने 2017 मध्ये आंध्रप्रदेश विजयवाडा येथे सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यावर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून तब्बल 16 किलो सोने घेऊन फरार झाला होता अशी माहिती चौकशीत पुढे आलेली आहे. आरोपी रावत उर्फ नेपाळी पप्पू हा माओवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती प्रकाशझोतात येत आहे. तो दरोडे जबरी चोऱ्या करून या माओवाद्यांना आर्थिक मदत करीत असल्याची शक्यता बाळावल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीच्या चिरोधात कलम 3, 25 भा ह का  37(1) महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

in lockdown robber arrested in Mumbai, read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in lockdown robber arrested in Mumbai, read full story