Mumbai : आर्थिक बदलाचे दूत व्हा; लोकसभाध्यक्षांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lok Sabha Speaker Om Birla

Mumbai : आर्थिक बदलाचे दूत व्हा; लोकसभाध्यक्षांचे आवाहन

मुंबई : आर्थिक बदलाचे दूत म्हणून संवाद, चर्चा आणि सहकार्याद्वारे उत्तम जगाच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लेखापालांना केले. मुंबईत आयोजित २१ व्या जागतिक लेखापाल अधिवेशनात (वर्ल्ड कॉग्रेस ऑफ अकाउंटंट्स) ते बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अधिवेशनाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केले.

जागतिकीकरण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेने आपल्यासमोर नवीन आव्हाने उभी केली आहेत. आर्थिक तज्ञ म्हणून या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता तुमच्यात आहे,असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.

लेखापालांच्या जागतिक अधिवेशनाने विश्वास, नैतिकता, विविधता आणि पारदर्शकता यासारख्या मुख्य विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

जागतिक लेखापाल संमेलन २०२२ हा अर्थ आणि व्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीच्या संकल्पनांचा मंच आहे. लेखा क्षेत्राशी संबंधित सहा हजाराहून अधिक व्यावसायिक या संमेलनामध्ये उपस्थित असून त्यात जगभरातील शंभर देशांतून आलेल्या अठराशेहून अधिक परदेशी प्रतिनिधींचा समावेश आहे.