Mumbai News : लोकमान्य टिळक टर्मिनसला भीषण आग! तिकीट आरक्षण केंद्राचेही नुकसान

मध्य रेल्वेचे लोकमान्य टिळक टर्मिसनच्या निर्माणाधीन पॉड हॉटेल आग लागण्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
lokmanya tilak terminus fire
lokmanya tilak terminus firesakal

मुंबई - मध्य रेल्वेचे लोकमान्य टिळक टर्मिसनच्या निर्माणाधीन पॉड हॉटेल आग लागण्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी, टर्मिनसवर असलेले जन आहार केंद्र जळून खाक झाले आहे. तसेच रेल्वेचे तिकीट आरक्षण केंद्राचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

आगीमुळे तब्बल १५ मिनिटे संपूर्ण रेल्वे स्थानकांचे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे वाहतूकीला फटका बसला होता.

मिळाल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनसच्या प्लँटफॉर्म क्रमांक एक लागून असलेल्या आरक्षण केंद्राच्या पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी स्लीपिंग पॉड उभारण्याचे काम सुरू आहे. येथे वेल्डिंगचे काम चालू असतानाच दुपारी २. ४५ वाजताच्या सुमारास मशीनचा स्फोट झाल्याने अजूबाजूला असलेल्या फर्निचरला आग लागली.

आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीनंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या आगीची भीषणता एवढी होती की जन आहार केंद्र जळून खाक झाले आहे. तर आरक्षण केंद्रातील आणि आजूबाजूला असलेल्या वायर्स आणि केबल उष्णतेमुळे आक्षरश: वितळल्या आहे. त्यामुळे येथील आरक्षण केंद्र ठप्प झाले असून ते तात्पुरते इतरत्र हालवण्यात येणार आहे. दरम्यान येथील आरक्षण तिकीट बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मत्स्यगंधा एक्सप्रेसला

ट्रेन क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेसला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी ३. २० वाजता सुटणार होती. मात्र, आगीमुळे रेल्वेने ओव्हर हेड वायरच्या विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे स्थानकावर गाडी उभी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर तब्बल १५ मिनिटानंतर आगीवर नियंत्रण मिळविल्यावर मध्य रेल्वेने ओव्हर हेड वायरमधील विद्युत पुरवठा सुरु केला. त्यानंतर दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी मत्स्यगंधा एक्सप्रेसला रवाना करण्यात आली.

चौकशीचे आदेश -

या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी स्लीपिंग पॉडबरोबरच लागून असलेले जन आहार केंद्र जळून खाक झाले आहे. त्यामुळे रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या घटनेमुळे दुपारनंतर रेल्वेचे आरक्षण केंद्र बंद झाले आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तसेच या आगीचा घटनेची दखल घेत मध्य रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहे. अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com