Loksabha 2019 : जाहिरातींच्या पैशांत कामे झाली असती - मनसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जाहिरातींवर खर्च केलेल्या ५२४५ कोटी रुपयांत अनेक समाजोपयोगी कामे झाली असती, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्‌विटरवरून केली आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जाहिरातींवर खर्च केलेल्या ५२४५ कोटी रुपयांत अनेक समाजोपयोगी कामे झाली असती, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्‌विटरवरून केली आहे.

मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध दंड थोपटले. आठवड्याभरापासून राज ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेऊन भाजप सरकार आणि मोदींवर टीका केली. मनसेने ट्विटर हॅंडलवरून मोदींच्या जाहिरातींसाठी सरकारने केलेल्या खर्चाची आकडेवारी दर्शवणारा व्हिडिओ शेअर केला. मोदींच्या जाहिरातींसाठी ५ वर्षांत ५२४५ कोटी खर्च केले गेले. इतक्‍या पैशांमध्ये कोणकोणती कामे झाली असती, हे मनसेने या व्हिडिओमधून दाखवले आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Advertise Money Narendra Modi Raj Thackeray MNS