Abhijit Bichukale : पहिल्याच दिवशी हवा करणारे बिचुकले कुठे दिसेना

प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना पहिल्या दिवशी हवा करणारे अपक्ष उमेदवार बिचुकले कुठे दिसेनासे झाले आहेत.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukalesakal

डोंबिवली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. कल्याण मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो आहे असे म्हणत बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी एंट्री केली होती.

प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना पहिल्या दिवशी हवा करणारे अपक्ष उमेदवार बिचुकले कुठे दिसेनासे झाले आहेत. यामुळे तेलाची धार फोडणीला बसलीच नाही असे बोलले जात आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आदी बडे नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे सभा घेतल्या आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला असेलेल्या या मतदारसंघात प्रथमच सेनेतील शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होत असल्याने मतदार कोणाला कौल देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाच बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. वादग्रस्त विधान करत नेहमीच चर्चेत राहिलेले बिचुकले आता कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रंगत आणतील असे सर्वांना वाटले होते. त्यामुळे त्यांच्याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. मात्र मतदारसंघात बिचुकले प्रचार करताना कुठे दिसतच नाही आहेत.

सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस मी येथेच ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते डोंबिवली दाखल पण झाले पण कधी, कुठे ते ठाण मांडून बसले आहेत ते ही कोणाला माहीत नाही. पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरताना बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढविला होता. नंतर मात्र ते कुठे प्रचार करताना दिसले नाही.

288 आमदारांपेक्षा मी नक्कीच प्रसिद्ध आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही मी जन्मापासून प्रसिद्ध आहे. परडे 50 हजार, 1 लाख रुपयाचे काम सोडून जनतेसाठी मी लढतो तर जनतेला माझ्याबरोबर आले पाहिजे असे बिचुकले म्हणाले नक्की पण त्यांच्या या प्रसिद्धीच्या जोरावर ते कल्याण लोकसभेतून किती मत खेचतात हे आता पहावे लागेल.

मतदारांना बिचुकले हे या मतदारसंघात उभे आहेत हे देखील माहीत नसताना बिचुकले आपला प्रचार कसा करत आहेत हे कोणालाच माहीत नाही.

याविषयी उमेदवार बिचुकले यांच्याशी संपर्क साधला असता मी डोंबिवली मध्येच आहे असे त्यांनी सांगितले. माझा जाहीरनामा मी प्रसिद्ध करत आहे. भेटून तुम्हाला सांगतो असे देखील ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com