शिवसेना नेते केदार दिघेंच्या नावे लूक आऊट नोटीस जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Look out notice issued to Shiv Sena leader Kedar Dighe

शिवसेना नेते केदार दिघेंच्या नावे लूक आऊट नोटीस जारी

मुंबई - मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना बलात्कार पीडितेला धमकावल्याच्या प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दिल्लीतील व्यावसायिक रोहित कपूरने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने गेल्या आठवड्यात केला होता. केदार दिघे यानी महिलेला तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची वाच्यता न करण्याची धमकी दिली. आरोपी रोहित कपूर यांच्या विरोधात मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी केली आहे. गुन्हेगारी धमकीच्या आरोपात केदार दिघे यांचेही नाव गुन्ह्यात नोंदवले असल्यामुळे त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे दिघे यांची नुकतीच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली. यापूर्वी या पदावर असलेले नरेश म्हस्के हे बंडखोर सेनेचे नेते आणि l मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छावणीत दाखल झाले आहेत. केदार दिघे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यामध्ये लढा देण्याकरिता जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता आता त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने येत्या काळामध्ये केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच त्यांच्यावर बलात्कारा संदर्भातील कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Web Title: Look Out Notice Issued To Shiv Sena Leader Kedar Dighe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..