Mumbai: पार्टीत प्रचंड दारू आणि कॉकटेल प्यायला अन्.. ; टाटा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

Death of student of Tata Institute: या पार्टीला अनुराग साडेनऊच्या आसपास तेथे आला. पार्टीत बीयर, व्हिस्की, व्होडका आणि रम या सर्व प्रकारातील मद्य त्याने रिचवले.
PARTY
PARTY
Updated on

मुंबई- बँकेतील व्यवस्थापक पदाची नोकरी सोडून दहा दिवसांपूर्वी मुंबईत आलेला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा (टीस) विद्यार्थी अनुराग जयस्वाल (२९) याने शनिवारी रात्री वाशी येथील पार्टीत क्षमतेपेक्षा जास्त आणि विविध प्रकारच्या मद्य एका मागोमाग एक रिचवल्याची माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे.

शनिवारी रात्री टीसच्या एचआर अँड लेबर रिलेशन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या नवख्या विद्यार्थ्यांना वाशी येथील रोअर लाउंज येथे पार्टी दिली होती. या पार्टीला अनुराग साडेनऊच्या आसपास तेथे आला. पार्टीत बीयर, व्हिस्की, व्होडका आणि रम या सर्व प्रकारातील मद्य त्याने रिचवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com