आता पासपोर्टवरही कमळाचं फूल, सरकारी यंत्रणांच्या भगवेकरणाचा घाट?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

सरकारी दस्तावेजावर भाजपचं निवडणूक चिन्ह ?

परदेश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या पासपोर्टच्या माध्यमातूनही भाजप आपला राजकीय अजेंडा रेटू पाहत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपामागचं नेमकं कारण काय?

जगभरात कुठेही प्रवास करण्यासाठी आवश्यक दस्तावेज असलेल्या भारतीय पासपोर्टवर कमळाचं चिन्ह दिसणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला जातोय. केरळच्या कोझिकोडमध्ये कमळ चिन्ह असलेल्या पासपोर्टचं वाटप झाल्याचा मुद्दा गुरूवारी संसदेत देखील प्रचंड गाजला. कमळ हे जरी राष्ट्रीय फुल असलं तरी ते भाजपचं निवडणूक चिन्ह असल्याने या माध्यमातून भाजप आपला राजकीय प्रचार करत असल्याचा विरोधकांचा दावा आहे.  

महत्त्वाची बातमी :  डेटिंगसाठी सुंदर मुलगी देतो सांगत लाखोंची लुट ; तिघे अटकेत

मात्र बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी आणि पासपोर्टची सुरक्षा मानकं अधिक बळकट करण्यासाठी कमळाचं चिन्ह लावल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा दावा आहे. शिवाय कमळ हे आपलं राष्ट्रीय फूल असून कमळाव्यतिरिक्त राष्ट्रीय प्राणी वगैरे चिन्हांचा सुद्धा पुढे या हेतूसाठी वापर करण्यात येणार असल्याचा दावाही सरकारने केलाय. म्हणजेच इंटरनॅशनल सिव्हील अॅव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या नियमावली अंतर्गत हे बदल करण्यात आल्याची पुस्तीही परराष्ट्र मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलंय. शिकागो करारानुसार जागतिक स्तरावरील विमान वाहतूक अधिक सुरक्षित आणि किफायतशीर करणं तसंच विमान वाहतूकीशी संबंधित नियोजन आणि विकासाबाबतच्या कार्यवाहीची जबाबदारी या संस्थेकडे आहे.

महत्त्वाची बातमी : तुमचा पर-डे इंटरनेट डेटा रात्रीत संपतो? 'हे' आहेत एकदम स्वस्त प्लान 

हा सगळा प्रकार म्हणजे सरकारी यंत्रणांचं भगवेकरण करण्याचा घाट घातल्याचा आरोप केला जातोय. यापुर्वीही शिक्षणाच्या भगवेकरणाचा आरोप भाजपवर झालाय. मात्र नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा शासकीय दस्तावेजाचा अशा पद्धतीने आपला राजकीय अजेंडा रेटण्यासाठी वापर होत असेल तर तो सर्वस्वी चुकीचाच म्हणावा लागेल. 

WebTitle : Lotus symbol on Indian passports as part of security features


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lotus symbol on Indian passports as part of security features