लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या; आत्महत्या केल्याचा प्रियकराचा बनाव उघड

लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या; आत्महत्या केल्याचा प्रियकराचा बनाव उघड
Updated on

भिवंडी ः लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिला निर्जनस्थळी नेऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीचा खून केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी ओढणीच्या साहाय्याने तिचा मृतदेह झाडावर प्रियकराने लटकवला. या विकृत प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलिस तपासात खुन केल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दिपक जगन्नाथ रुपवते (वय 31 वर्ष, गोविंदवाडी, कल्याण पश्‍चिम ) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. दिपक याला न्यायालयात हजर केले असता त्याला 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत तरुणी व आरोपी दीपक यांचे प्रेमसंबंध होते. दीपक हा व्यवसायाने रिक्षा चालक असून त्याने किरणकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र 
किरण त्याच्याशी विवाह करण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने किरणला शनिवारी (ता.9) कल्याणमधून फिरण्याच्या बहाण्याने रिक्षात बसून भिवंडी येथील निर्जन स्थळी नेले. तिच्याकडे लग्नाचा तगादा लावला. तिने नकार देताच त्याने तिच्या ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर ओढणीच्या साह्याने तिने गळफास घेतल्याचे भासवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला लटकवून ठेवला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती 3 दिवसांनी स्थानिक कोनगाव पोलिस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत किरणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद बुधवारी (ता.12) करण्यात आली होती. दरम्यान मृतक तरुणीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे पोस्टमार्टममध्ये समोर आले. 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com