मुंबईत पावसाची उसंत; तलावातील पाणीसाठा होतोय कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Lake-Water-Storage

मुंबईत पावसाची उसंत; तलावातील पाणीसाठा होतोय कमी

पाणी कपातीबाबत महिना अखेरपर्यंत BMC महापालिका ठरवणार भूमिका

मुंबई: पावसाने ब्रेक घेतल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा संपू लागला आहे. गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी साठा तलावात जमा आहे. 2019च्या तुलनेने निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा जमा आहे. मात्र, पाणी कपातीबाबत तात्काळ निर्णय न घेता महिना अखेरपर्यंत प्रतिक्षा बघण्याची भुमिका महापालिकेने घेतली आहे. मात्र, या आठवड्यात पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी बैठक होण्याची शक्‍यता आहे. (Low Rainfall in Mumbai Resulted into lack of water storage in the lakes)

जुलै महिन्याचे 10 दिवस संपले तरी अद्याप मुंबईत पावसाने जोर धरलेला नाही. मुंबईसहा ठाणे जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी त्यात सातत्य नाही. मुंबईला वर्षभर पाणी पुरवठा होण्यासाठी 14 लाख 63 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र, आजच्या दिवशी 2 लाख 54 हजार 958 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 3 लाख 17 हजार 397 दशलक्ष लिटर आणि 2019 मध्ये 5 लाख 47 हजार 568 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.

वेधशळाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यामुळे जुलै अखेर पर्यंत प्रतिक्षा करुन पुढील निर्णय घेण्याची भूमिका महानगर पालिकेने घेतली आहे. मात्र, दर 15 दिवसांनी पाणीसाठ्याचा अंदाज घेतला जातो.त्यामुळे या आठवड्यात पाणीसाठ्या बाबत बैठक होण्याची शक्‍यता आहे.

दोन महिन्यांचा पाणीसाठा

मुंबईला रोज 3,950 दक्षलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.सध्या तलावांमध्ये 2 लाख 54 हजार दक्षलक्ष लिटर पाणीसाठा आहे.हे पाणी 64 दिवस मुंबईला पुरू शकेल.

(संपादन- विराज भागवत)