कर्नाटकच्या तिरंग्याचा मुंबईत बोलबाला.. 

हर्षल भदाणे पाटील
Saturday, 25 January 2020

झेंडे विक्रीतून 12 ते 15 लाख रूपयांचा व्यवसाय

मुंबई : प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी बाजार तिरंग्यांनी सजले आहेत. बाजार आणि रस्त्यांवर कागदी झेंडे विकणाऱ्या मुलांची गर्दी दिसत आहे. महानगरी मुंबईत अनेक ठिकाणी झेंडे बनवण्याचे छोटे कारखाने आहेत. मात्र घाऊक बाजारात विकले जाणारे झेंडे हे कर्नाटकमधून आणले जातात. 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताकदिन मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करत असतो. हा जल्लोष तिरंग्याशिवाय पूर्ण होत नाही. 

प्रजासत्ताक दिनाच्या आठवडाभर आधीपासूनच दुकाने, रस्त्यांवरील सिग्नलजवळ प्लास्टिकच्या लहान-मोठ्या तिरंगी झेंड्यांची विक्री सुरू होते. हे ध्वज, बिल्ले, स्टिकर नेमके येतात कुठून आणि बनतात कुठे, हा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला असतो. 

मोठी बातमी मुंबईत एअर-स्ट्राईकची भीती? मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय..

मुंबईतील भायखळा, मालाड, सायन, धारावी, महालक्ष्मी या ठिकाणी झेंडे बनवणारे छोटे-छोटे कारखाने आहेत. परंतु, मुंबईतील "होलसेल' दुकानांत मात्र कर्नाटक राज्यातून झेंडे येतात. लालबाग भागात झेंड्यांची विक्री करणारे सुमारे 28 व्यापारी आहेत. गणपतीच्या मूर्ती बनवण्याची लगबग उत्सवाला दीड-दोन महिने असतानाच सुरू होते, त्याचप्रमाणे झेंडे बनवण्याचीही लगबग महिनाभर अगोदरच सुरू होते. 

बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे पाहायला मिळत आहेत. लहान-मध्यम-मोठ्या आकाराचे झेंडे, कापडी झेंडे, तिरंगी बिल्ले व स्टिकर, तिरंगी मफलर व फेटे, तिरंगी साडी आणि तिरंगी टाय क्‍लिप असे वैविध्य दिसत आहे. प्लास्टिकचे झेंडे घेण्याऱ्यांची संख्या मात्र कमी होत चालल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

मोठी बातमी मुंबई 'नाईट लाईफ'वर अमृता फडणवीस म्हणतात...

बाजार सजले 
- बाईकवरील झेंडा 30 ते 50 रुपये 
- कारवरील झेंडा 70 ते 100 रुपये 
- खादीचा झेंडा (2 बाय 3) 250 रुपये 
- खादीचा झेंडा (3 बाय 4.5) 500 रुपये 
- खादीचा झेंडा (4 बाय 6) 1000 रुपये 
- तिरंगी मफलर 10 रुपये 
- तिरंगी फेटा 100 रुपये 
- तिरंगी साडी 200 ते 300 रुपये

रोजगार आणि नफाही 
भायखळा येथील द फ्लॅग वर्क कंपनी 25 ते 30 वर्षांपासून मंत्रालय, महापालिका, जिल्हा परिषद, सरकारी कार्यालयांसाठी मोठे झेंडे बनवते. महत्त्वाच्या कार्यक्रमांत फडकणारे राष्ट्रध्वज या कंपनीत तयार केले जातात. लहान ध्वज, कापडी ध्वज, बिल्ले, स्टिकर, कार आणि बाईकवर लावण्याचे ध्वज बनवले जात असल्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. या काळात 12 ते 15 लाखांचा नफा होतो, असे सांगण्यात आले. तिरंगा प्रत्येक नागरिकाच्या हातात असावा म्हणून आम्ही झटतो; तसेच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानंतर दुसऱ्या दिवशी सर्वत्र पसरलेले झेंडे गोळा करण्याचे कामही करतो, असे कंपनीचे मालक ज्ञान शहा यांनी सांगितले. 

झेंडे प्लास्टिकपासून न बनवता पर्यावरणपूरक कापडापासून बनवण्याला मी देशभक्ती मानतो. आपल्या झेंड्यची कोणत्याही प्रकारे अवहेलना होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतो. 
- ज्ञान शहा, मालक, फ्लॅग वर्क 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हल्ली झेंडेविक्रीच्या व्यवसायात घट झाली आहे. फक्त 40 टक्के झेंडे विकले जातात. नोटाबंदीपासून या व्यवसायात मंदी आली आहे. 
- सागर पारेख, घाऊक झेंडा विक्रेते  

made in karnataka flags sold in mumbai special report on republic day 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: made in karnataka flags sold in mumbai special report on republic day