स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

सव्वा तीन कोटींना विकला बंगला 

बॉलीवूडमधील अभिनेता असो किंवा अभिनेत्री, प्रत्येकाकडे करोडोंची प्रॉपर्टी. सर्वसामान्यांना त्याच्या घराबाहेर उभं राहून फोटो जरी काढता आला तरी भारी वाटतं. याच लिस्टमध्ये टाॅपवर आहे मराठमोळी अभिनेत्री आणि बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने.     

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने. बॉलीवूडमधील एक अशी अभिनेत्री जिच्याकडे चक्क एक प्रायव्हेट जेट सुद्धा आहे. पण आता माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit Nene) चक्क आपला बंगलाच विकला आहे.    

महत्त्वाची बातमी :  दहावी पास आहात ? 56 हजारांची नोकरी वाट पाहतेय 

माधुरीने जो बंगला विकायला काढलाय तो बंगला फार जुना आहे. 1990 मध्ये माधुरी दीक्षित ने 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hain Kon) या सारखे अनेक हिट सिनेमे केलेत. तिनं बॉलीवूडमध्ये आपली खास ओळख, आपला वेगळा ठसा उमटवला. तेंव्हाच खरतर हा बंगला माधुरी दीक्षितला मंजूर करण्यात आला होता. 

या बंगल्याची खासियत म्हणजे या बंगल्याचा नंबर आहे 310, मात्र हा बंगला माधुरी दीक्षित यांचा बंगला म्हणून फेमस झाला. आजही लोकं त्याला माधुरीचा बंगला म्हणूनच ओळखतात. आजही अनेक जण हा बंगला बाहेरून का होईना पाहण्यासाठी येत असतात. मात्र माधुरीने आता हा बंगला विकला आहे. 

महत्त्वाची बातमी : देशात दिवसाला 124 तर मुंबईत दररोज दोघांचा बळी घेतोय हा आजार

माधुरीचे पती श्रीराम नेने यांनी नुकतीच या बंगल्याच्या विक्रीबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. हा बंगला तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांना विकला गेलाय. हा बंगला आता क्लीयर ट्रिप डॉट कॉम (ClearTriip.Com) चे संस्थापक अमित तनेजा यांना विकण्यात आलाय.   

माधुरीचा हा बंगला हरियाणा मधील पंचकुला इथला आहे. पंचकुला इथल्या MDC सेक्टर 4 मध्ये 1996 मध्ये माधुरी दीक्षितला मुख्यमंत्री कोट्यातून एक प्लॉट मंजूर करण्यात आला होता. याच जागेवरील बंगला आता माधुरीने विकला आहे.  

WebTitle : madhuri dixit nene sold her bunglow to amit taneja    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhuri dixit nene sold her bunglow to amit taneja