
नवी मुंबई : सिडको काळापासून नवी मुंबईतील विविध ठिकाणी बेकायदा उभारण्यात आलेल्या सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना दिलासा मिळणार आहे. ही धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय लावून धरला होता. त्यानंतर आज मिसाळ यांच्या दालनात बैठक पार पडली.