
Government Employees Digitization of Service Booklets
ESakal
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती जवळ आल्यानंतर सेवापुस्तिकेची पडताळणी करावी लागते. बऱ्याचदा यात वेळ गेल्यास त्याचा परिणाम त्यांना मिळणारे निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीनंतरच्या लाभांवर होत असतो. याला पर्याय म्हणून आता कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधीच्या सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे.