MAHA TET Paper Leak Update
esakal
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महत्त्वाची घोषणा करत उमेदवारांना दिलासा दिला आहे. आधीच नोंदणी केलेल्या कोणत्याही उमेदवाराला पुन्हाअर्ज करण्याची गरज नाही. तसेच नव्याने कोणतेही परीक्षा शुल्कही आकारले जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.