esakal | Mumbai: महाड दुर्घटनेतील साक्षी दाभेकर पुन्हा पायावर उभी राहण्यास सक्षम
sakal

बोलून बातमी शोधा

महाड दुर्घटनेतील साक्षी दाभेकर

महाड दुर्घटनेतील साक्षी दाभेकर पुन्हा पायावर उभी राहण्यास सक्षम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या देवांशला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (वय 14) ही क्रीडापटू जबर जखमी झाली. तिच्यावर गेले अडीच महिने

केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून तिला आपला डावा पाय गमवावा लागला. पण, साक्षी आता पुन्हा चालू , फिरु लागली आहे कारण, तिला जयपूर फुटच्या सहकार्याने कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे. कृत्रिम पाय आणि वाॅकरच्या साहाय्याने साक्षी आपल्या मोठ्या बहिणीच्या मदतीने हळूहळू चालत आहे. या फूट मुळे साक्षी पुन्हा पायावर उभी राहू शकली आहे. शिवाय, साक्षीची जखम ही आता बर्यापैकी भरली आहे.  पण, पूर्णपणे पाय बरा होण्यास अजून किमान एक वर्षाचा कालावधी लागेल असे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: पुणे : महापालिकेतर्फे २४ ऑक्टोबरला 'प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन

दरम्यान, साक्षी पुन्हा चालू फिरु लागल्याने तिला खूप आनंद झाला आहे पण, आपण गेले अडीच महिने केईएममध्ये असल्याने तिला वाईटही वाटतेय. साक्षी म्हणाली आता माझी प्रकृती स्थिर आहे, पुन्हा घरी परतायचे आहे. माझी बहीण ही माझ्यासोबत अडीच महिन्यांपासून इथे आहे. लवकरच मला डिस्चार्ज देणार आहे.

घटनेनंतर साक्षीला तातडीने मुंबईत हलवण्यात आल्यानंतर डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. साक्षी धावपटु आहे, कब्बडी आणि खो खो तालुकास्तरावर खेळते.

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या साक्षीवर उपचार सुरू असून सर्व उपचारांचा खर्च पालिकेकडून होणार आहे. तिला सध्या जयपूर फूट बसवला आहे. जेणेकरून तिच्या पायाची हालचाल होऊ शकते. किमान 6 महिने तिची जखम पूर्णपणे बरी होण्यास लागतील त्यानंतर तिच्यावर ऑटोबोक शस्त्रक्रिया केली जाईल.

loading image
go to top