esakal | Pune: महापालिकेतर्फे २४ ऑक्टोबरला 'प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन
sakal

बोलून बातमी शोधा

प्लॉगेथॉन २०२१

पुणे : महापालिकेतर्फे २४ ऑक्टोबरला 'प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेकडून शहर स्वच्छ करण्यासाठी विवध उपक्रम राबविले जात असताना आता प्लॉगेथॉन २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम २४ ऑक्टोबर शहरात होणार असून, यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. महापालिकेने यापूर्वी २०१९ मध्ये ‘प्लॉगेथॉन’चे आयोजन केले होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, प्रभाग रस्त्यावरील कर्मचारी

यासह एक लाखापेक्षा जास्त पुणेकरांनी सहभाग नोंदवत स्वच्छ पुण्यासाठी मोठा हातभार लावला होता. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने २०२० मध्ये या उपक्रमात खंड पडला. यानंतर यंदा पुन्हा आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली : फुटीर नगरसेवकांचा अपात्रतेची सुनावणी लांबणीवर

यंदा ९८ मुख्य रस्ते आणि १७८ उद्यानात आयोजन करण्यात येत असून महापालिका व खासगी अशा ५०० शाळा यात सहभागी होणार आहेत.'प्लॉगेथॉनचा उपक्रम राबवताना क्षेत्रिय कार्यालय स्तरावर बारकाईने नियोजन करणे, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांचा सहभाग वाढवणे, प्रतिष्ठीत नागरिक या मोहिमेत सहभागी करुण यावर काम सुरू आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

प्लॅगेथॉन म्हणजे काय ?

प्लॅगेथॉनचा इंग्रजी अर्थ ‘अ कॉम्बिनेशन आॅफ जॉगिंग विथ पिकिंक अप लिटर’ असा आहे. पिक अप लिटर म्हणजे कचरा उचला आणि चाला. सकाळी नागरिक व्यायामासाठी बाहेर चालत निघाल्यांतर कचरा उचलावा असे यामध्ये अपेक्षीत आहे. कचरा मुक्ती म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य ही साखळी लक्षात घेऊन प्लॉगिंगचे महत्व आहे. भारतात १० हजार ठिकाणी प्लॉगिंग केले जाते. २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळात विविध ठिकाणी हा उपक्रम पुण्यात राबविला जाईल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

loading image
go to top