महाडमधील ज्येष्ठ नागरिकांची नर्मदा परिक्रमा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

सुधीर गोगटे, दिलीप बागडे, भगवान केळकर, माधव गाडगीळ, रमेश बडे या पाच वीरांनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. 101 दिवसांत 3200 किमी अंतर या सर्व प्रवासात त्यांनी पायी कापले.

महाडः वयाची साठी पूर्ण केलेल्या आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या महाडमधील पाच साहसवीरांनी 101 दिवसांत 3200 किलोमीटरची परिक्रमा पायी पूर्ण केली.
 
25 फेब्रुवारीला संध्याकाळी महाडमध्ये या पाच जणांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुधीर गोगटे, दिलीप बागडे, भगवान केळकर, माधव गाडगीळ, रमेश बडे या पाच वीरांनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. 101 दिवसांत 3200 किमी अंतर या सर्व प्रवासात त्यांनी पायी कापले. मंगळवारी सायंकाळी त्यांचे महाड शहरात आगमन होताच फटाके वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले.

नियम धाब्यावर, मर्जीतील अधिकारी यांना क्रीम पोस्टिंग

चवदार तळे येथील श्रीराम मंदिराच्या वतीने या पाच परिक्रमावीरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ कीर्तनकार मिलिंद बडवे, उपनगराध्यक्ष संदीप जाधव, श्रीनिवास भाटे, शरद गांगल, श्रीकृष्ण बाळ, रामभाऊ आंबेकर, सुधीर शेठ उपस्थित होते. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी परिक्रमा पूर्ण करणाऱ्या पंचवीरांचे अभिनंदन करताना ही बाब ऐतिहासिक शहरवासीयांच्या दृष्टीने गौरवास्पद असल्याचे सांगताना नर्मदा परिक्रमेचे महत्त्व सांगितले. श्रीनिवास भाटे यांनी प्रास्तविक केले. या वेळी रामभाऊ आंबेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील नागरिक उपस्थित होते. पल्लवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यापूर्वीही या ज्येष्ठांनी पंढरपूर, आळंदी व काशी पायीवारी केली आहे. 

महाडमधील पाच वीरांनी पूर्ण केलेली खडतर अशी नर्मदा परिक्रमा तरुणांना प्रेरणादायी आहे. यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन पुढील वर्षी 25 महाडकरांनी ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
- मिलिंद बडवे, ज्येष्ठ कीर्तनकार 

परिक्रमेच्या वेळी आपल्याला प्रत्येक दिवशी प्रेम, मानवतावादी आणि आपुलकीचे दर्शन झाले. म्हणूनच ही परिक्रमा यशस्वीपणे पार पडली. 
- सुधीर गोगटे, परिक्रमा पूर्ण करणारे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahad narmada parikraman