महापालिकेने घेतला 'हा' मोठा निर्णय; 44 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च करणार

BMC
BMCsakal media

मुंबई : महालक्ष्मी रेसकार्स (mahalaxmi racecourse) येथील जंम्बो कोविड केंद्र (corona center) सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेने (bmc) घेतला आहे. यात, 205 अतिदक्षता बेड्स (ICU beds) आणि 250 विलगीकरण बेड्स (quarantine beds) तयार करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका 44 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

BMC
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी खासगी रुग्णालयांकडून नमुने; महापालिकेपुढे मोठे आव्हान?

कोविडच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेने 1 लाखा बेड्स कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यातील 30 हजार बेड्स हे महापालिका रुग्णालय तसेच जंम्बो कोविड केंद्रातील असतील.त्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे जंम्बो कोविड केंद्र बांधण्यात येणार आहे.यात वैद्यकिय प्राणवायू,अतिदक्षता विभाग तयार करण्यात येणार आहे.

तसेच,विलगीकरणासाठी बेड्स राखून ठेवण्यात येणार आहे.तब्बल 205 अतिदक्षता बेड्स असतील तर 250 विलगीकरणासाठी बेड्स राखीव असतील.असे 455 बेड्सचे हे कोविड केंद्र बांधण्यात येणार आहे.टप्प्या टप्पाने हा विस्तार करण्यात येणार आहे.यासाठी महानगर पालिका 44 कोटी 83 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.तसा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

अग्निसुरक्षा यंत्रणा

या केंद्रात अग्निसुचना आणि अग्निसुरक्षा यंत्रणाही उभारण्यात येणार आहे.या सर्व कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल.त्यासाठीही महानगर पालिका 13 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.तसेच,या कोविड केंद्रामुळे रुग्णालयावरील ताण कमी होईल असा दावा केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com