"२१ व्या शतकात भारत जी प्रगती करतोय ती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे" : फडणवीस

सुमित बागुल
Sunday, 6 December 2020

कोरोनाच्या संकटात गर्दी करू नका असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला आंबेडकर अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला याचाही आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मुंबई : आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे आपापल्या घरातूनच किंवा डिजिटल माध्यमांच्या मदतीने आंबेडकरांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत आदरांजली अर्पण करतायत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. 

महत्त्वाची बातमी : शहरांची 'लाइफस्टाईल' या गटामध्ये संशोधन करताना देशातील चौदा विविध शहरांचा अभ्यास करण्यात आला

माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणालेत की, "२१ व्या शतकात भारत जी प्रगती करत आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान महत्वाचे आहे. त्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. जात पंचायतीविरोधात कायदा केलेले महाराष्ट्र हे राज्य आहे. समाजात चुकीच्या प्रवृत्ती असतात, त्या ठेचल्या पाहिजेत आणि अशा प्रवृत्तींना ठेचण्याचे काम सर्वांना करावे लागेल, असं फडणवीस म्हणालेत.   

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेत की, "मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली याचा आनंद आहे. त्यांना देखील व्हिजिन लक्षात आले आहे की कशा पद्धतीने महाराष्ट्र बदलू शकतो आणि महाराष्ट्राचा मागास भाग मुंबईशी जोडला जाऊ शकतो. त्यांनी याआधी विरोध केला होता, मात्र आता मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाच्या बाजूने आहेत याचे समाधान आहे", असं फडणवीस म्हणालेत.

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

कोरोनाच्या संकटात गर्दी करू नका असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला आंबेडकर अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला याचाही आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

mahaparinirvan din leader of opposition devendra fadanavis paid tribute to dr babasaheb ambedkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahaparinirvan din leader of opposition devendra fadanavis paid tribute to dr babasaheb ambedkar