esakal | मुंबईची जीवनशैली देशात एक नंबर! पुणे देखील आहे एका महत्त्वाच्या बाबतीत 'टॉप'वर

बोलून बातमी शोधा

मुंबईची जीवनशैली देशात एक नंबर! पुणे देखील आहे एका महत्त्वाच्या बाबतीत 'टॉप'वर  }

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे साक्षर महानगरांच्या यादीत पुण्याला ९१ टक्के मते मिळाली आहेत.

mumbai
मुंबईची जीवनशैली देशात एक नंबर! पुणे देखील आहे एका महत्त्वाच्या बाबतीत 'टॉप'वर
sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : भारतात राहणीमानाच्या दृष्टीने, जीवनशैलीमध्ये कोणतं शहर सर्वात उत्तम आहे, हे तुम्ही कुणाला विचारलं तर तुम्हाला विविध उत्तरं मिळतील. याबाबत IIT मुंबईद्वारा एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

IIT बॉम्बेद्वारा भारतातील विविध शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये लाइफस्टाईलच्या बाबतीत मुंबईचा पहिला क्रमांक लागला आहे. पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी या संशोधनातून समोर आली आहे. देशातील साक्षर महानगरांच्या गटामध्ये पुण्याच्या पहिला नंबर लागलाय. 

महत्त्वाची बातमी मुंबईतील लालबागच्या गणेशगल्लीत भीषण स्फोट; वीस जण जखमी

चौदा विविध शहरांचा अभ्यास

शहरांची 'लाइफस्टाईल' या गटामध्ये संशोधन करताना देशातील चौदा विविध शहरांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये मुंबई एक नंबरवर तर त्याखालोखाल दिल्ली, कोलकाता या शहरांचा क्रमांक लागतो. पहिल्यांदाच शहरांच्या विविध छटांबाबत संशोधन करताना लैंगिक समानतेचा देखील विचार करण्यात आला. यामध्ये चेन्नईचा पहिला क्रमांक लागतोय. चेन्नई मागोमाग मुंबई आणि कोलकाता शहरे अनुक्रमके दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. लैंगिक समानतेच्या बाबत बिहारची राजधानी पाटणा सर्वात तळाला आहे.  

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

पुण्याला ९१ टक्के मते

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे साक्षर महानगरांच्या यादीत पुण्याला ९१ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे साक्षर महानगरांच्या यादीत पुणे अव्वल ठरलं आहे. तर संपूर्ण देशात चेन्नई हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असल्याचं या संशोधनातून समोर आलंय. महिलांशी निगडीत गुन्हे होण्याचे प्रमाण जयपूरमध्ये सर्वात जास्त असल्याची बाब समोर आली आहे. 

IIT bombay reserch says mumbais lifestyle is best in India