नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार तसेच समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार तसेच समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात 500  गुन्हे दाखल झाले असून 262 व्यक्तींना अटक केली आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

राज्यातील विविध पोलिस स्टेशन मध्ये एकूण 500  गुन्ह्यांची नोद करण्यात आली आहे. त्यात 34 अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 196 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 206 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन असेल, पण पोटाला कुलुप कसे लावणार? अनेकांनी शोधला वेगळा मार्ग

आक्षेपार्ह टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 27 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी  9 गुन्हे दाखल झाले आहेत, तर इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य समाज माध्यमांचा गैरवापर केल्या प्रकरणी  58 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  262आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 107 आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात आल्या आहेत.

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

सध्याच्या काळात बरेच लोक समाज माध्यमांचा जास्त प्रमाणात वापर करत आहेत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.  ऑनलाईन पुस्तके, साहित्य, गाणी, चित्रपट, वेबसेरीज आणि अन्य गोष्टी अधिकृत संकेतस्थळावरून विकत घ्यावे किंवा बघावे. अशा गोष्टी अनधिकृत संकेतस्थळांवर बघणे हा कायद्याने गुन्हा आहेच, तसेच अशा संकेतस्थळांवरून तुमच्या नकळत एखादे मालवेअर किंवा संगणक व्हायरस येऊन तुमचा संगणक किंवा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना सजग राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharahstra cyber departments files 500 cases against cyber theft