

Fadnavis Announces ₹48,000 Crore Farm Power Bill Waiver, Promises 12 Hours of Free Electricity
sakal
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ शेतकऱ्यांचे ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. याशिवाय वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.