Maharashtra Assembly Election 2024 : जागावाटपात ओढाताण सुरूच! ठाकरेंच्या धोरणावर काँग्रेस नाराज

अर्ज भरण्यासाठीच्या अखेरची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा मार्ग आज मोठ्या प्रमाणात अनुसरला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील अंतर्गत ओढाताणीचा मुद्दा राहिला असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने स्वत:कडे घेतलेल्या जागांमुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाला वाचवा असे साकडे घातले. दुसरीकडे, ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा संघर्ष झाला तर महायुतीला लाभ होईल, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपातील अंतिम आकडा आत्ताच जाहीर करू नका असे भाजपला विनवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com