मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द केल्याबद्दल विधानसभेत आभाराच्या प्रस्तावावरून जोरदार खडाजंगी झाली. जेव्हा निर्यात शुल्क लावले तेव्हाही सभागृह सुरू होते, ती माहिती सभागृहात का दिली नाही? असा सवाल करत लाखो टन कांदा कुजून गेला त्याची भरपाई देणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत काँग्रेसचे सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.