राज्य अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला, 6 मार्चपासून सुरू होणार अधिवेशन!

सकाळ न्यूज नेटवर्क 
Tuesday, 11 February 2020

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पी अधिवेशन मुंबईत सोमवारपासून (ता. 24) सुरू होणार असून राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री डॉ. अनिल परब यांनी दिली. 

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पी अधिवेशन मुंबईत सोमवारपासून (ता. 24) सुरू होणार असून राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री डॉ. अनिल परब यांनी दिली. 
विधान भवनात विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

कोरोना बद्दलचं संवेदनशील सत्य चीन सरकार लपवतंय

परब म्हणाले, की या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा निश्‍चित केला असून यात 18 दिवस कामकाज होणार आहे. गुरुवारी (ता. 6) 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. 24 फेब्रुवारीला 2019-20 च्या पुरवणी मागण्या आणि 2014-2015, 2015-16, 2016-17 या आर्थिक वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या सादर करण्यात येतील. तसेच, या अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे. पाच अध्यादेशही सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती परब यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra assymbly session will begin on March 6