esakal | शिवसैनिकांची दादागिरी; दुकानदारांना मारहाण करीत दुकान बंद | Beating
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsainik
शिवसैनिकांची दादागिरी; दुकानदारांना मारहाण करीत दुकान बंद

शिवसैनिकांची दादागिरी; दुकानदारांना मारहाण करीत दुकान बंद

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यानंतर दिव्यातही शिवसैनिकांनी दुकानदारांना मारहाण करीत दुकान बंद करण्यास सांगितले. याचे सीसीटीव्ही व्हायरल झाले असून दुकानाचे अर्धे शटर उघडून शिवसैनिकांनी दुकानदारांना मारहाण केल्याचा आरोप भाजपा ने केला आहे. शिवसेनेने हा आरोप फेटाळला असून राजकारण करण्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक पणा दाखवावा असा सल्ला दिला.

लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला. दिवा शहरातही बंद पाळण्यात आला होता. ठाणे मध्ये शिवसैनिकांनी रिक्षा चालकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच दिव्यातील एक सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत आहे. यामध्ये एका दुकानाचे अर्धे शटर उघडे होते, ते उघडून काही जणांनी दुकानदाराला बोलून दुकान बंद करताना दिसतात. हे शिवसेनेचे कार्यकर्ते असून साबे गावातील दोन दुकानदारांना त्यांनी मारहाण करीत जबरदस्ती दुकान बंद करण्यास लावल्याचे भाजपा

दिवा शहर मंडळ अध्यक्ष आदेश भगत व दिवा शिव मंडळ सचिव सचिन भोईर यांनी सांगितले.

हेही वाचा: नितीन गडकरी अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये बैठक, काय होणार चर्चा?

राम प्रजापती व कैलाश कुमावत या दुकानदारांनी बंद पाळला होता. राम हे त्यांच्या दुकानात रहात असल्याने दुपारी त्यांनी हवा येण्यासाठी अर्धे शटर उघडले होते. तर कैलाश हे दुकान बंद करून दुध विक्री करत होते. तेवढ्यात रिक्षातून आलेल्यांनी मारहाण करीत दुकान बंद करण्यास सांगितले. शिवसैनिक जबरदस्ती दिव्यातील दुकाने बंद केली, दुकान बंद असतानाही लहान व्यापाऱ्यांना मारहाण केली. दुकानदारांनी याविषयी दिवा पोलीस चौकीत तक्रार केली असून भाजपा त्यांच्या पाठीशी आहे असे भोईर यांनी सांगितले. तर भाजपा दिवा शहर मंडळ अध्यक्ष आदेश भगत म्हणाले, दिव्यात इतक्या समस्या असताना कधी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरले नाहीत. परंतु कुठेतरी जबरदस्तीने दुकान बंद करणे मारझोड करणे यासाठी रस्त्यावर दिसले. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.

शिवसेनेने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. सेनेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंद पुकारला होता. दिव्यातही कडकडीत बंद आहे, एखाद्याने दुकान उघडले ठेवले असेल आणि त्याला जर दुकान बंद करण्याची विनंती करण्यात आली तर त्यात चुकीचे काय. व्हिडीओ मध्ये कोणीही कोणाला मारहाण करताना दिसत नाही. उगाच अफवा पसरवण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपाने राजकारण करण्यापेक्षा किमान शेतकऱ्यांप्रती तरी प्रामाणिक राहावे.

loading image
go to top