.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली - बदलापूरात शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी बॅनर बाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लेकी बाळी साठी हा बंद पुकारण्यात आला असून सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.