esakal | Photo : महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत वाटतायत पत्रकं..
sakal

बोलून बातमी शोधा

Photo : महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत वाटतायत पत्रकं..

Photo : महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत वाटतायत पत्रकं..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. दिल्लीत एकूण ७० जागांवर निवडणुका लढवल्या जाणार आहेत. येत्या ८ तारखेला दिल्लीकर EVM मध्ये उमेदवारांचं भवितव्य बंद करणार आहेत. ११ फेब्रुवारीरोजी दिल्लीतील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. अशात दिल्लीत निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय. दिल्लीचं वातावरण निवडणूकमय झालंय. या निवडणुकांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, आम आदमी पार्टी, जनता दल (युनायडेट), काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी आणि इतर असे सर्वजण आपलं नशीब आजमावणार आहेत.

मोठी बातमी - ...आणि समोरून धडधडत आला मृत्यू, बातमी वाचाल तर डोळ्यातून पाणी येईल

जोरदार शक्तिप्रदर्शन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वच पक्षांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जातंय. दिल्लीत सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सत्तापालट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आतुर आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्लीत तळ ठोकून आहेत.   

मोठी बातमी - एअरटेल ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..

भाजप नेत्यांचं पत्रक वाटप 

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांनी दिल्लीतील काही भागांमध्ये सभा घेतल्या. आता महाराष्ट्र भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील दिल्लीत नागरिकांशी संवाद साधतायत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावलाय. दिल्लीतील विविध मतदार संघातील रहिवासी भागात चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारसभा झाल्या. तर काही ठिकाणी पदयात्रा काढून भाजपला मतदानासाठी मतदारांना आवाहन केले. अशात चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत प्रचारसभेदरम्यान मतदारसंघात जाऊन भाजपाची पत्रकं देखील वाटली आहेत. दरम्यान या पत्रकवाटपावरून नेटकऱ्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जातेय.  

मोठी बातमी - मेट्रो ट्रेन तोडते मुंबईकरांच पाणी

देशात सध्या CAA आणि NRC वरून राजकीय वातावरण तापलंय. अशात दिल्लीत मोठ्याप्रमाणात आंदोलनं सुरु आहेत. दिल्लीतील शाहीनबागमध्ये  CAA आणि NRC वरून गेले अनेक दिवस आंदोलन सुरु आहे. अशात भाजप नेत्यांकडून, शाहीनबागमध्ये सुरु असलेली आंदोलनं ही विरोधकांची निवडणुकीसाठी केलेली खेळी असल्याचं भाजप नेते म्हणतायत.    

maharashtra bjp president chandrakant patil distributing pamphlets in delhi