

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष सोमवारी निवडले जाणारे असून उद्या (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करायचा आहे. भाजपने महायुतीतील मित्र पक्षांची चर्चा करून मावळत्या सभागृहातील अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच वर्धा जिल्ह्यातील समीर कुणावर आणि चैनसुख संचेती ही नावे दिल्लीला पाठवली असल्याचे समजते. या नावांमधून एका नावाला दिल्लीहून पसंती मिळेल त्या व्यक्तीची निवड अध्यक्षपदी केली जाणार असल्याचे समजते.