esakal | मनसुख यांचा मृतदेह आढळलेला त्याच खाडीत आज आणखी एक मृतदेह सापडला
sakal

बोलून बातमी शोधा

death 2.jpg

रेतीबंदरमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली.

मनसुख यांचा मृतदेह आढळलेला त्याच खाडीत आज आणखी एक मृतदेह सापडला

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंब्रा रेती बंद खाडीजवळ आणखी एक मृतदेह सापडला आहे. काही दिवसांपूर्वी याच खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. आज मुंब्रा रेती बंदर खाडीजवळ जो मृतदेह सापडलाय, त्याची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो ४८ वर्षांचा होता. शेख सलीम अब्दुल मुंब्रा रेतीबंदरचाच राहणारा होता. पोलीस अधिकाऱ्यांकडे हा मृतदेह सोपवण्यात आला आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही कार ज्यांच्याकडे होती, त्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याच मुंब्र्याच्या खाडीत त्यांचा मृतदेह सापडला होता. 

शेख सलीम अब्दुल तिथे का गेले होते?
मृत व्यक्तीचे नाव शेख सलीम अब्दुल असून तो मुंब्रा रेतीबंदरचा रहिवाशी आहे. पेशाने तो मजूर आहे. रात्री सव्वा अकराच्या सुमारास तो तिथे असाच फिरण्यासाठी म्हणून गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरुन तो खाडीत पडला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

ही घटना घडल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केलं. 
अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडीतून अब्दुल यांचा मृतदेह बाहेर काढला. अब्दुल यांचा सुद्धा बुडूनच मृत्यू झाला. अब्दुल यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. 

मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. प्रथमदर्शनी यामध्ये काही चुकीचे घडले नसल्याचे पोलिसांचे मत आहे. पण शवविच्छेदन अहवालातूनच बऱ्याच गोष्टी समोर येतील.

loading image
go to top