esakal | मुख्यमंत्र्यांच्या भाषणातल्या 'त्या' वक्तव्यावर भडकले अबू आझमी, म्हणाले...

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातल्या 'त्या' वक्तव्यावर भडकले अबू आझमी, म्हणाले...}

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन भलतेच संतापले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप केले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातल्या 'त्या' वक्तव्यावर भडकले अबू आझमी, म्हणाले...
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन भलतेच संतापले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप केले. हे भाषण चांगलंच चर्चेत आलं. मुख्यमंत्र्यांनी या भाषणात भाजपवर निशाणा साधत अनेक गोष्टींची आठवण करुन दिली. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांची आठवण काढली आणि म्हटलं की, बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसंच मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेले वक्तव्य योग्य नव्हते. महाविकास आघाडी सरकारमधील मुस्लिम नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करून राजीनामे द्यायला हवेत, असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढे अबू आझमी म्हणाले की, उद्धव ठाकरे आता केवळ एका पक्षाचे प्रमुख नसून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कालच्या भाषणात ते जे काही बोलले ते चुकीचं होतं. एका अपराधासाठी ते स्वतःला श्रेय घेताहेत. अशात मुस्लिम मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं आवाहन आझमी यांनी केलं आहे.  ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

हेही वाचा-  मुंबईत नव्या रुग्णांचा उद्रेक, शहरात कोरोनाचा वाढता आलेख

मुख्यमंत्र्यांनी बोलायला नव्हतं पाहिजे. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती. बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे, असंही ते म्हणालेत.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra budget session SP leader Abu Azmi criticized cm uddhav thackeray