esakal | मुंबईत नव्या रुग्णांचा उद्रेक, शहरात कोरोनाचा वाढता आलेख

बोलून बातमी शोधा

मुंबईत नव्या रुग्णांचा उद्रेक, शहरात कोरोनाचा वाढता आलेख}

मुंबईत बुधवारी 1121 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,28,740 झाली आहे. काल 734 रुग्ण बरे झाले.

मुंबईत नव्या रुग्णांचा उद्रेक, शहरात कोरोनाचा वाढता आलेख
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत बुधवारी 1121 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,28,740 झाली आहे. काल 734 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,06,373 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत काल 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,482 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 235 दिवसांवर आला आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.29 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 33,31,942 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

हेही वाचा-  मंत्र्यांना वाचवा बाईला नाचवा सरकारचा संतापजनक कार्यक्रम, अतुल भातखळकरांची टीका


मुंबईत कोरोनाचा वाढता आलेख

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात पुन्हा वाढू लागली आहे . हा रुग्णवाढीचा सरासरी दर ०.२३ % इतका आहे . एकूण २९ प्रभागांपैकी ७ प्रभागात हा दर अधिक असल्याचं गेल्या काही दिवसातल्या आकडेवारी वरून स्पष्ट होतोय . त्यामुळे या प्रभागात प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून अधिक अधिक उपाययोजना केल्या जात आहेत .

प्रभाग आणि सरासरी रुग्णवाढ दर

अंधेरी प      -  ०.३८
वांद्रे प         -  ०.४३
चेंबूर           -  ०. ४२
गोवंडी        -  ०.३३
मुलुंड         -  ०.४०
सायन        -  ०.३४
घाटकोपर   -  ०.४१

मुंबईत बुधवारी मृत झालेल्या सर्व 6  रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 3 पुरुष तर 3 महिला रुग्णाचा समावेश होता. तर सहा ही मृतकांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्याासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत 16 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 161 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6256 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 422 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus increase patients cases cross 1 thousand first two days March