

devendra fadnavis ajit pawar eknath shinde
esakal
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सार्वजनिक आरोग्य, न्याय, शिक्षण, महसूल, ग्रामविकास आदी क्षेत्रांत नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. यात शहरी भागातील आरोग्य सुविधांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय उभारण्याचा समावेश आहे.