मोठी बातमी : शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात गावपाड्यातील आमदारांना दिली संधी..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

उद्धव ठाकरेंनी फिरवली सत्तेची भाकरी..

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधीक मोठे बदल हे शिवसेनेत झालेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत मोठे धाडसी निर्णय घेतलेत. पक्षातील प्रस्थापितांना दूर करत गावपाड्यातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री मंडळात संधी दिलीय.

आज मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून शहरी भागातील दिग्गज आमदारांना बाजूला सारून ग्रामिण भागातील नव्या चेहर्यांना मंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी निमंत्रीत केलंय. मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांतून फक्तं विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनाच संधी दिलीय तर शिवसेनेचा पारंपारीक बालेकिल्ला असणाऱ्या कोकणातून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना संधी दिलीय.

मोठी बातमी :  राष्ट्रवादीकडून 13 मंत्री घेणार शपथ; NCP कडे 10 कॅबिनेट 3 राज्यमंत्री

वेळच्या मंत्री मंडळात शिवसेनेनं ग्रामिण भागातून निवडून येणाऱ्या आमदारांना सर्वाधीक संधी दिलीय. यामध्ये अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. ज्यांनी शिवसेनेला विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणुन ग्रामिण महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सत्तेची भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याची माहीती मिळतेय.

महत्त्वाची बातमी : धक्कादायक! 'या' महापालिकेकडून वर्षभरात केवळ १४ प्रकारची औषधे खरेदी!

शिसेनेकडून हे आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ : 

 • गुलाबराव पाटील 
 • संजय राठोड
 • दादा भुसे
 • अनिल परब
 • शंभूराजे देसाई
 • उदय सामंत
 • बच्चू कडू
 • अब्दूल सत्तार
 • संदिपान भुमरे
 • राजेंद्र पाटील-येड्रावकर
 • शंकरराव गडाख
 • आदित्य ठाकरे 

शिवसेनेनं या दिग्गज आमदारांना वगळलं जे माजी आधी मंत्री देखील होते. 

 • दिवाकर रावते
 • रामदास कदम
 • तानाजी सावंत
 • रविंद्र वायकर
 • दिपक केसरकर

maharashtra cabinet expansion shivsena candidate list shows maximum ministers are from rural maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cabinet expansion shivsena candidate list shows maximum ministers are from rural maharashtra