
Maharashtra Cabinet meeting held ahead of Diwali where three major decisions were officially announced to benefit citizens and boost development.
esakal
Maharashtra Cabinet Meeting three decisions announced : दिवाळीच्या आधी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज(मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवाय, महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर कऱण्यात आलं आहे.
या धोरणाच्या कालावधीत पाच लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. याचसबोत द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी ५०० कोटींच्या विकास योजनेची घोषणा करण्यात आली. कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांची विस्तृत माहिती पाहूया.
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, ५ लाखांवर रोजगार निर्मिती केली जाणार आहे. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार आहे. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय असेल .
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.