Varsha Gaikwad: काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं घडलंय काय?

A case has been registered against Congress MLA Varsha Gaikwad; चार विविध कलमांतर्गत त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Varsha Gaikwad_Congress
Varsha Gaikwad_CongressEsakal

नवी दिल्ली : काँग्रेसच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांसह केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं हा गुन्हा दाखल झाला असून चार विविध कलमांतर्गत त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Maharashtra case has been registered against Mumbai Congress president Varsha Gaikwad)

कशासाठी गुन्हा दाखल?

बुधवारी वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करत होते. या आंदालनासाठी त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळं गायकवाड यांच्यासह ५० ते ६० काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भादंवि आणि मुंबई पोलीस कायद्यानुसार कलम १४३, १४५, १४९ आणि १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com