esakal | महाराष्ट्र बंद ; लसीकरणाच्या पथ्यावर पडले
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

महाराष्ट्र बंद ; लसीकरणाच्या पथ्यावर पडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आजच्या महाराष्ट्र बंदचा फटका विविध घटकांना बसला असतांना लसीकरणाचा मात्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. दिवसभरात तब्बल 1 कोटी 506 लाभार्थींचे लसीकरण झाले. त्यामुळे आजचा महाराष्ट्र बंद लसीकरणाच्या पथ्यावर पडल्याचे दिसले.

शुक्रवारी मुंबईत दिवसभरात 93,556 लाभार्थींचे लसीकरण झाले. त्यानंतर शनिवारी लसीकरणाचा आकडा काहिसा कमी झाल्याचे दिसले. शनिवारी 80,965 लाभार्थींचे लसीकरण झाले. रविवारी लसीकरणाचा कार्यक्रम बंद असतो. तर आज सोमवारी मात्र लसीकरणाचा आकडा वाढला असून 1 कोटी 506 लाभार्थींचे लसीकरण झाले. नेहमीपेक्षा साधारणता 15 ते 20 हजार अधिक लाभार्थींचे लसीकरण झाले.

आज एकूण 473 कोविड लसीकरण केंद्र लसीकरण करण्यात आले. याठिकाणी 553 सेशन घेण्यात आले. महानगरपालिकेच्या 309 केंद्रांवर 78,473 तर राज्य सरकारच्या 20 केंद्रांवर 5161 लाभार्थींचे लसीकरण झाले. तर खासगी 144 केंद्रांवर 16,872 लाभार्थींचे लसीकरण झाले. मुंबईत आतापर्यंत 1 कोटी 31 लाख 87 हजार 629 लाभार्थींचे लसीकरण झाले.

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक

आज दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या अधिक होती. पहिला डोस 39,550 तर दुसरा डोस 60,956 लाभार्थींची घेतला.तर कोव्हीशिल्ड लस घेतलेल्या एका लाभार्थीला किरकोळ त्रास झाल्याची माहिती देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद

पुकारल्याने अनेक नागरिकांनी आज दांडी मारली. बंद मुळे आज रस्ते ही बऱ्यापैकी मोकळे होते. अशा परिस्थितीत लाभार्थींनी आपले आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचे लसीकरण उरकून घेतल्याने लसीकरणाचा आकडा वाढला.

loading image
go to top