दिल्ली निकालानंतर उद्धव ठाकरेंनी 'असा' लगावला भाजपाला टोला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

अरविंद केजरीवाल यांनी 'जन की बात' देशाला दाखवून दिली..

मुंबई : आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला असून दिल्लीतील जनतेने 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विधानसभा निकालानंतर दिली आहे.

मोठी बातमी -  शीsss ! ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..

दिल्ली निकालांबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत.  

मोठी बातमी - राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसैनिकांनी आझाद मैदानात केलं...

दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला असं उद्धव ठाकरे म्हणाले.

maharashtra cm uddhav thackeray on delhi assembly elections


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra cm uddhav thackeray on delhi assembly elections