राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसैनिकांनी आझाद मैदानात केलं...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नुकताच आझाद मैदानावर महामोर्चा पार पडला. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मोर्चाला लाखो कार्यकर्ते आल्याने मैदानावर कचरा साठला होता. मोर्चानंतर मनसैनिकांनी आझाद मैदानाची साफ सफाई केली. राज ठाकरे  यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी या मनसैनिकांचे कौतुक केले आहे. याबाबत अमित ठाकरे यांनी मनसैनिकांचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट केली आहे.

'या' भाजप नगरसेवकाला भोवलं खंडणीप्रकरण, कोर्टाने सुनावली पोलिस कोठडी..

मनसेने पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढला. यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले होते. लाखोंच्या संख्येने जमा झालेल्या कार्यकर्त्यांमुळे मैदानावर कचरा झाला. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आपआपल्या गावाकडे गेले. मात्र, यानंतर अनेक मनसैनिकांनी आझाद मैदान स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले.

याकार्यकर्त्यांनी नियोजन करून संपुर्ण मैदान स्वच्छ केले. आझाद मैदान साफ केल्याने अमित ठाकरेंनाही मनसैनिकांचे कौतुक वाटले. त्यांनी मनसैनिकांचे कौतुक करणारी पोस्ट फेसबुक वर पोस्ट केली. '' आझाद मैदान येथील सभेनंतर तो संपुर्ण परिसर स्वच्छ करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम'' असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मुलं आणि महिलांच्या तस्करी बाबतचं धक्कादायक वास्तव

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना राजकारणात अधिकृतरित्या उतरवण्यात आले. अमित सक्रिय राजकारणात येण्या आधी मोजक्याच विषयांवर व्यक्त होत होते. सध्या ते समाजमाध्यमांवर सक्रिय असतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: march ended and the MNS volunteers cleaned the grounds