esakal | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध किती गुन्ह्यांची नोंद ?
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध किती गुन्ह्यांची नोंद ?

उमेदवारी अर्ज दाखल करताना एका प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती आणि आपल्यावरील गुन्हे याबाबत माहिती देणं बंधनकारक असतं. याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीये. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध किती गुन्ह्यांची नोंद ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. सर्वात आधी महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यातील पत्रव्यवहार आणि त्यानंतर काँग्रेसने  २ उमेदवारांची केलेली मागणी. या सर्वच गोष्टींमुळे ऐन कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत, कोरोना विरुद्धच्या युद्धात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.

आज विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख होती. आज उद्धव ठाकरे यांनी आपला विधान परिषद आमदारकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना एका प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती आणि आपल्यावरील गुन्हे याबाबत माहिती देणं बंधनकारक असतं. याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीये. 

आरोग्य यंत्रणांवरील ताण होणार कमी, नवीन डिस्चार्ज पॉलिसी उपयोगी ठरणार का ?

उद्धव ठाकरे यांच्यावर किती गुन्हे ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्हे त्याचसोबत तक्रारींची माहिती जाहीर करण्यात आली. उद्धव यांच्याविरुद्ध एकूण २३ गुन्हे दाखल होते. त्यापैकी १२ गुन्हे रद्द झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांनी शिवसेना सोल्यानंतर सामानाबाहेर सभा घेतली होती त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे समर्थकांमध्ये राडा झालेला. त्याबाबत गुन्ह्याची नोंद पोलिस पोलीस स्टेशनमध्ये आहे. याव्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध काही खासगी तक्रारी आहेत.

यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करावा ? काय बदल होऊ शकतो ? काय म्हणतायत मोठी मंडळं 
 

उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती ? 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साधारणतः १२५ कोटींची संपत्ती आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावावर मातोश्री आणि बांधकाम सुरु असलेला मातोश्री २ हे बंगले आणि कर्जतमधील फार्म हाऊस असल्याची माहिती समोर येतेय. महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या नावावर एकही गाडी नसल्याचं देखील समजतंय. उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा विविध शेअर्सवर मिळणारा डिव्हीडंट असल्याचं समजतंय. आपली संपत्ती जाहीर करणारे उद्धव ठाकरे हे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर दुसरे ठाकरे ठरलेत. 

दरम्यान उद्धव ठाकरे यांचं प्रतिज्ञापत्र अद्याप संकेस्थळावर अपलोड करण्यात आलेलं नाही. 

maharashtra CM uddhav thackeray filled MLC election form check what are UTs criminal record