आरोग्य यंत्रणांवरील ताण होणार कमी, नवीन डिस्चार्ज पॉलिसी उपयोगी ठरणार का ?

आरोग्य यंत्रणांवरील ताण होणार कमी, नवीन डिस्चार्ज पॉलिसी उपयोगी ठरणार का ?

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. मुंबईत कोरोनाचे दररोज सरासरी 500 रुग्ण सापडत असल्याने रुग्णालये खचाखच भरली आहेत. त्यातच आता शासनाने डिस्चार्ज पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. या पॉलिसीमुळे रुग्णालायत झालेली गर्दी कमी होऊन आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत मिळेल.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. तर अश्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केले जात होते. मुंबईत दररोज सरासरी 500 रुग्ण उपचारासाठी  दाखल होत होते, तर तेव्हढेच संशयित रुग्ण ही सापडत होते. मुंबईत आतापर्यंत 12,689 बाधित रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर 14,401 पेक्षा अधिक संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामुळे सर्व रुग्णालयांतील कोविड, आयसोलेश आणि क्वारंटाईन सेंटर रुग्णांनी खचाखच भरले आहेत. 

केवळ रुग्णांची व्यवस्थाच नाही तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर देखील ताण येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत आणखी साधारणतः 400 ते 500 डॉक्टरांची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये, आयसोलेशन वॉर्ड तसेच क्वारंटाईन सेंटर उभे केले तरी तिथे लागणारा वैद्यकीय कर्मचारी वर्ग कुठून आणायचा हा प्रश्न बाकी आहेच.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने कोविड 19 रुग्णांसाठी निश्चित केलेल्या आधीच्या डिशचार्ज पॉलिसीमध्ये बदल केला आहे. नवीन पॉलिसी रुग्णाच्या लक्षणांच्या स्थितीवर अवलंबून आहे. सौम्य, अति सौम्य व लक्षणे नसलेल्य रुग्णांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्यात आले असेल त्यांची दररोज दोन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणे सुरू झाल्या पासून 7 व्या 8 व्या व 9 व्या दिवशी ताप नसल्यास 10 व्या दिवशी तपासणी करून डिस्चार्ज देण्यात येईल. या रुग्णांना डिस्चार्ज करताना कोविड चाचणी आवश्यक नाही. शिवाय या रुग्णांचे पुढील 7 दिवसांसाठी घरीच विलागीकरण करण्यात येईल. या रुग्णांमध्ये डिस्चार्ज करण्यापूर्वी ऑक्सिजनचे प्रमाण 95 टक्के पेक्षा कमी आढळून आल्यास त्या रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरला संदर्भित करण्यात येईल.

या रुग्णांना पुन्हा ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात येईल किंवा ते टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या रुग्णांचा 14 व्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करावा व लक्षणे नसल्याची खात्री करावी. मध्यम लक्षणे असणाऱ्या ज्या रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडमध्ये दाखल करण्यात आले आहे पण त्यांना 3 दिवस काही लक्षणे नसतील व ऑक्सिजन चे प्रमाण 95 पेक्षा अधिक आहे अश्या रुग्णांची ऑक्सिजन सॅच्युरेशनसाठी तपासणी करण्यात येणार आहे.

ज्या रुग्णांना 3 दिवसात  ताप कमी झाला आहे , पुढील 4 दिवस  ज्याच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा रुग्णांना 10 व्या दिवशी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अश्या रुग्णांना डिस्चार्ज वेळी कोरोना चाचणीची आता गरज नाही. जे रुग्ण गंभीर आहेत किंवा जे रुग्ण एच आय व्ही, ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण आहेत RT PCR पद्धतीने लक्षणे नसलेल्या रुग्णांचा एक नमुना निगेटिव्ह येणे महत्वाचे आहे.

कंटेंटमेंट झोन मधील बदल

पालिकेने मुंबईतील 'कंटेन्मेंट झोन'च्या पॉलिसीमध्ये देखील बदल केला आहे. त्यामुळे कोरोणामुळे सील झालेल्या परिसरात थोडी शिथिलता येण्याची शक्यता आहे. ज्या घरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. त्या घराला मध्यवर्ती मानून त्याच्या आसपासचा साधारणत: 500 मीटरचा परिसर ही सील केला जातो. यालाच कंटेनमेंट झोन म्हटलं जातं. दाटीवाटीच्या शहरी भागात अधिकाऱ्यांनी हा परिसर निश्चित करावा, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. त्यानुसार आता डिस्चार्ज पॉलिसीत बदल झाल्याने कंटेनमेंट झोन घोषित करण्यात निकष देखील बदलणार आहेत. त्यामुळे मुंबईतील बरेच कंटेनमेंट झोन कमी होणार असून प्रशासनावरील ताण कमी होणार आहे, शिवाय लोकांना ही मोकळीक मिळणार आहे. 

news discharge policy will help to reduce pressure on health workers and health system

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com