esakal | शुल्क सवलतीच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री ठाकरे मूग गिळून बसलेत - अतुल भातखळकर
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Bhatkhalkar And CM

शुल्क सवलतीच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री ठाकरे मूग गिळून बसलेत - अतुल भातखळकर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत (Fee Concession) देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मागील आठवड्यात केली खरी, परंतु महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी (Ministers) त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) यावर सुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केलीय. (Maharashtra CM Uddhav Thackeray keeps silence on fee concession of school Atul Bhatkhalkar Criticizes -nss91)

हेही वाचा: Malegaon Blast : एनआयएने हायकोर्टात सादर केली 'ही' महत्वाची माहिती

ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्यासाठी ही केवळ चालढकल करण्याचे धोरण अवलंबले आहे. केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम 'शिक्षणसम्राट-धार्जिणे' महाविकास आघाडी सरकार करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. यासंदर्भात आमची लढाई न्यायालयात सुरू असून न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी-पालकांना फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे भातखळकर यावेळी म्हणाले.

loading image