esakal | रा.. रा.. रा.. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणासोबत पाहणार ‘तान्हाजी', वाचा..
sakal

बोलून बातमी शोधा

रा.. रा.. रा.. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणासोबत पाहणार ‘तान्हाजी', वाचा..

रा.. रा.. रा.. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणासोबत पाहणार ‘तान्हाजी', वाचा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’, (Tanhaji- The Unsung Warrior)  150 कोटींच्या लीगमध्ये जाणारा नवीन वर्षातील पहिला सिनेमा. या सिनेमाच्या माध्यमातून तान्हाजी मालुसरे आणि कोंढाणा मोहीम रुपेरी पडद्यावर साकारण्यात आली आहे. या सिनेमात अजय देवगण (Ajay Devgan ) सोबत सैफ अली खान,  शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. अनेकांनी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहिलाय आणि त्याचं तोंडभरून कौतुकही केलंय. 

मोठी बातमी - कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...

अशात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणार आहेत. आज उद्धव ठाकरे ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट पाहणार आहेत. मुंबईतील प्रसिद्ध प्लाझा चित्रपटगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा सिनेमा पाहणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांची प्लाझामध्ये तान्हाजीचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं आहे.

या स्क्रीनिंगची खासियत म्हणजे चित्रपाटात तान्हाजींची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगण हा देखील मुख्यमंत्र्यांसोबत चित्रपट पाहणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता या सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं आहे. 

मोठी बातमी - मॉलमधील अनधिकृत दुकानांवर हातोडा 

कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशकात तान्हाजी चित्रपट पहिला. यानंतर त्यांनी पोस्टरसमोर काढलेला सेल्फी देखील आपल्याला पाहायला मिळाला. अशात आज स्वतः मुख्यमंत्री हा सिनेमा पाहणार आहेत. काही राज्यांमध्ये तान्हाजी सिनेमा टॅक्स फ्री (Tax Free) करण्यात आलाय. महाराष्ट्रातूनही हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी होताना दिसतेय, त्यामुळे आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर, महाराष्ट्रात तान्हाजी सिनेमा टॅक्स फ्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

maharashtra cm uddhav thackeray to watch tanhaji the unsung warrior with actor ajay devgan

loading image