esakal | शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांना पत्र | cm uddhav Thackeray
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Train

शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांना पत्र

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई आणि परिसरातील आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा (school) आणि कनिष्ठ महाविद्यालये (colleges) ही 4 ऑक्टोबर पासून सुरू केली जाणार आहेत. मात्र या शाळा सुरू करण्यापूर्वी सर्वात अगोदर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या लोकल प्रवासासाठी (train travelling permission) स्वतंत्र आदेश जारी करावेत अशी मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm udddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरू

शिक्षक आमदार नागो गाणार आणि शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई आणि परिसरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 40 टक्केहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे मुंबईजवळ असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यातील वसई, कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, टिटवाळा आदींसह नवी मुंबईतील पनवेल आदी परिसरातून आपल्या शाळांमध्ये येत असतात. त्यामुळे त्यांच्या लोकल प्रवासावर वेगळे आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणी जुमानत नाही. यामुळे लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली आहे. तसेच या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी आत्तापर्यंत कोणत्याही निश्चित सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण असून ते तातडीने दूर करण्याी मागणीही करण्यात आली आहे.

loading image
go to top