esakal | राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरू | college
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरू

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील विद्यापीठे (university) आणि त्या अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये (colleges) ही दिवाळीनंतर (Diwali) ऑफलाईन पद्धतीने (offline) सुरू केली जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज मुंबईत केली. सामंत यांच्या घोषणेमुळे मागील दीड वर्षांपासून महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्षात शिक्षण घेण्यासाठी आतूर झालेल्या लाखो विद्यार्थ्यांना (student) मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

महाविद्यालये सुरू करण्यासाठी टास्क फोर्ससोबत चर्चा करून कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील आणि यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलून निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने नवीन शैक्षणिक वर्षांच्या सत्राला 1 नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. मात्र त्याच काळात दिवाळीचा उत्सव असल्याने ही महाविद्यालये दिवाळीनंतरच ऑफलाईन पद्धतीने सुरू केली जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत उच्च शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी सर्वच कुलगुरूंनी सकारात्मक वातावरण असल्याचे अहवाल दिले आहेत. त्यासोबत स्थानिक स्तरावरील प्रवेश, अभ्यासक्रम आणि प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू करण्यासाठी असलेली तयारी याचीही माहितीही दिली सादर केली. त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी लवकरच राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना आणि त्याची नियमावलीही तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: BMC: भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी २४ भुखंडाचे हस्तांतर

प्राचार्य, प्राध्यापक भरतीही लवकरच

राज्यातील महाविद्यालंयांमध्ये रिक्त असलेल्या प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या भरतीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेली फाईल ही येत्या काही दिवसांत वित्त विभागाकडे जाणार आहे. त्यामुळे राज्यात रिक्त असलेल्या ३ हजार ७४ हून अधिक प्राध्यापकांच्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच काही प्राध्यापकांना तासिका तत्वावर काम करत असताना त्यांना चांगले मानधन मिळायला हवे यांचाही विचार केला जात असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

उपस्थितीसाठी सक्ती नाही

दिवाळीनंतर राज्यात सुरू होणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्षात उपस्थितीसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही. त्यांना तशी सवलत दिली जाणार आहे. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भात कमी असला तरी त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नियमावलींची अंमलबजावणी करूनच ही महाविद्यालये सुरू केली जातील असेही सामंत यांनी सांगितले.

loading image
go to top