esakal | थोरातांच्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोना, बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन; थोरातांचे रिपोर्ट....
sakal

बोलून बातमी शोधा

थोरातांच्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोना, बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन; थोरातांचे रिपोर्ट....

कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

थोरातांच्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोना, बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन; थोरातांचे रिपोर्ट....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली नसल्याचं आपण पाहिलं आहे. डॉक्टर असो वा पोलिस किंवा राजकारणी लोकं यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधल्या तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सध्या होम क्वांरटाईन आहेत. थोरात यांच्या मुंबईतील बंगल्यापर्यंत करोना पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्यानं थोरात होम क्वारंटाईन झालेत.

मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय....

टेलिफोन ऑपरेटरला करोनाची लागण झाल्यानंतर बंगल्यावरील अन्य कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या अन्य वीस जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. थोरात यांनीही कोरोना टेस्ट केली असून या सर्वांचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहेत. थोरात हे सध्या मुंबईतच आहेत. दक्षता म्हणून त्यांनी स्वत:ला तेथेच क्वांरटाईन केलं असून आता रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली. त्याआधी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्या सुरक्षारक्षकांनी कोरोनावर मात केली आणि त्यानंतर दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

मोठी बातमी - अजित पवारांबाबत संजय राऊतांच 'मोठं' वक्तव्य, पत्रकार परिषदेत राऊत म्हणालेत...

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

maharashtra congress leader balasahe thorat did his swab test and awaiting for reports