esakal | अजित पवारांबाबत संजय राऊतांच 'मोठं' वक्तव्य, पत्रकार परिषदेत राऊत म्हणालेत...
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवारांबाबत संजय राऊतांच 'मोठं' वक्तव्य, पत्रकार परिषदेत राऊत म्हणालेत...

पारनेर शिवसेना नगरसेवक फोडाफोडीनंतर स्वतः संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

अजित पवारांबाबत संजय राऊतांच 'मोठं' वक्तव्य, पत्रकार परिषदेत राऊत म्हणालेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार, महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीत समोर येणाऱ्या कुरबुरी आणि सोबतच पारनेरमधील शिवसेना नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जातेय.

आमचं उत्तम सुरु आहे : 

उद्धव ठाकरे उत्तम प्रकारे सरकार चालवतायत. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरु आहे. आमच्यात कोणतेही खटके उडालेले नाहीत. खटके उडणं हा मीडियाचा शब्द आहे. आम्ही हा शब्द कधीही वापरलेला नाही. एकमेकांमध्ये चर्चा व्हायलाच हवी, ते जिवंतपणाचं लक्षण असतं असं संजय राऊत म्हणालेत. त्यांनी यावेळी बोलताना मागील सरकारचं देखील उदाहरण दिलं. या आधी शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं. त्यावेळी दोघेच असताना देखील आमच्यात कुरबुरी होत्या. चर्चा करणं, एकमेकांशी बोलणं हे लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे आमच्यात उत्तम संवाद आहे आणि राज्याचा कारभार उत्तम पद्धतीने सुरु आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. 

मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय...

ते पूर्णपणे स्थानिक राजकारण : 

पारनेर शिवसेना नगरसेवक फोडाफोडीनंतर स्वतः संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. पारनेरमधील नगरसेवक हे राष्ट्रवादीत गेलेत म्हणजे अजित पवारांनी फोडाफोडी केली असा अर्थ होत नाही. ते पूर्णपणे तिथलं स्थानिक राजकारण आहे, असंही संजय राऊत म्हणालेत.

पोलिसांच्या बदल्यांचं राजकारण करू नये :

देवेंद्र फडणवीसांकडून सातत्याने महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप केला जातोय. देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही. हे सरकार तीन प्रमुख पक्षांनी बनवलं असून ही खिचडी नाही असंही राऊत म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्व बारीक सारीक बाबींकडे लक्ष आहे. त्यामुळे कुणीही मुंबईतील पोलिसांच्या बदल्यांचं राजकारण करू नये असंही राऊत म्हणालेत. 

अंगावर काटा आणणारी बातमी ! मुलांवर बारीक लक्ष ठेवा, नाहीतर १२ वर्षीय सुमितसारखं व्हायला वेळ लागत नाही...
 
शरद पवारांची प्रदीर्घ मुलाखत : 

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. येत्या शनिवारपासून समाज माध्यमांवर आणि सामनामधून ही मुलाखत आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळेल. तीन भागांमध्ये ही मुलाखत असणार आहे. गेल्या अनेक दिवसानंतर शरद पवारांसोबत प्रदीर्घ मुलाखत केली असं राऊत म्हणालेत. येत्या काळात उद्धव ठाकरे यांची सोबतच अनेक बड्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचं संजय राऊत म्हणालेत. 

shivsena MP sanjay raut on ajit pawar and mumbi dcp transfer issue read full news