राज्यात कोरोना मृत्यूंमध्ये घट; १५ जिल्ह्यात फक्त १ मृत्यू

डेल्टा व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळलेल्या प्रदेशात नोव्हेंबर महिन्यात फक्त एकाच मृत्यूंची नोंद
corona update
corona updatesakal media

मुंबई :  कोरोना महामारीच्या (corona Pandemic) दुसऱ्या लाटेनंतर (corona second wave) राज्यातील मृत्यूंमध्ये दिवसेंदिवस घट नोंदवली (corona death decreases) जात असून ही एक दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, त्यापेक्षाही विशेष बाब म्हणजे जगाला सतावणाऱ्या डेल्टा व्हेरियंटने (Delta variant) राज्यातील ज्या प्रदेशातून पहिला रूग्ण दिला, त्या प्रदेशातील जिल्ह्यातून नोव्हेंबर महिन्यात एका मृत्यूची नोंद (only one corona death) राज्याची आकडेवारी दाखवते.

corona update
नवी मुंबई : NMMT बसचालक, वाहकाला मारहाण; किरकोळ कारणावरून वाद

एक मृत्यू दाखवणारे असे 15 जिल्हे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिले आहे. यावरून कोविड मृत्यू  जगात आजही थैमान घालत असताना राज्यातील मृत्यू घटीची नोंद प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. या महिन्यात मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली असून आतापर्यंतची ही सर्वात कमी नोंद आहे.

अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम हे नऊ जिल्हे विदर्भातील आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे सर्वाधिक फटका बसलेले हे जिल्हे आहेत. अमरावतीतून पहिल्यांदा डेल्टा व्हेरियंट जगासमोर आला होता असेही सांगण्यात आले होते. पण, अजूनही याचा पूर्ण शोध लागला नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. याच विभागातील उर्वरित जिल्हे, जसे की चंद्रपूर आणि वर्धा येथे प्रत्येकी दोन आणि एक मृत्यूची नोंद झाली आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव यासह उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि मराठवाड्यातील दोन, हिंगोली आणि नांदेडमध्येही एकाही कोविड मृत्यूची नोंद झालेली नाही. तर, कोकण पट्ट्यातील पालघर या एकमेव जिल्ह्यात एकाही मृत्यूही नोंद झालेली नाही.

corona update
विकसकाकरिता २१ हजार झाडे तोडली; भाजप आमदाराचे आदित्य ठाकरेंना पत्र

एका राज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही जिल्हे दाट लोकवस्तीचे नाहीत तसंच, कमी शहरी लोकसंख्येचाही या जिल्ह्यांना फायदा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात 591 कोविड मृत्यूची नोंद झाली आहे, जी ऑक्टोबरमधील 1,013 आणि सप्टेंबरमधील 1,645 नोंदीपेक्षा कमी आहे. राज्यात दुसऱ्या लाटेचा परिणाम मार्चपासूनच जाणवू लागला. फेब्रुवारीमध्ये 1,463 एवढे मृत्यू नोंद झाले होते ज्याची नोंद वाढून मार्चमध्ये 6,070 एवढे मृत्यू नोंदले गेले. राज्यासाठी एप्रिल आणि मे हे सर्वात प्राणघातक महिने होते ज्यात कोविडने अनुक्रमे 29551 आणि 28,664 लोकांचा बळी घेतला.

दरम्यान, धुळे आणि भंडारा येथे अनुक्रमे एप्रिल आणि जूनपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यात 90 दिवसांपासून एकही कोविड मृत्यू नोंदल गेलेले नाहीत. 16 नोव्हेंबरपर्यंतच्या राज्य विश्लेषणात असे दिसून आले आहे की बहुतेक मृत्यू आता सहा जिल्ह्यांमध्ये होत आहेत.  मुंबईत सर्वाधिक (49), अहमदनगर (46), सातारा (25), पुणे (23), रायगड (14) आणि ठाणे (14) या जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय, आणखी 14 जिल्ह्यांमध्ये एक अंकी मृत्यूंची नोंद झाली आहे.

याविषयी राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शुभाश साळुंखे यांनी सांगितले की, शून्य मृत्यूंची नोंद ही चांगली बाब आहे. पण, लगेचच कोविड नियम पाळणे सोडू नये. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत चाचण्यांवर भर दिला गेला पाहिजे. राज्यात ३ लाखांपर्यंत चाचण्या केल्या जायच्या मात्र आता हे प्रमाण कमी झाले. बुधवारी, राज्यातील कोविड मृत्यूची संख्या 41होती, जी 11 दिवसांतील सर्वाधिक आहे.

राज्यातील कोविड मृत्यू 2021

जानेवारी - 1702

फेब्रुवारी - 1463

मार्च - 6070

एप्रिल - 29551

मे - 28664

जून- 7856

जुलै - 3949

ऑगस्ट - 2916

सप्टेंबर - 1645

ऑक्टोबर - 1013

नोव्हेंबर - 591

एकही मृत्यू नसलेले जिल्हे

अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, नागपूर, नांदेड,नंदुरबार, पालघर, वाशिम, यवतमाळ

मृत्यूदर जास्त असलेले जिल्हे

वर्धा - 9 टक्के

चंद्रपूर - 8.7 टक्के

रत्नागिरी - 7.1 टक्के

सातारा - 6.1 टक्के

बीड - 5.7 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com